युरोपिअन महासंघात रहायचं की नाही यावर ग्रीसमध्ये रविवार सार्वमत

युरोपिअन महासंघात रहायचं की नाही यावर ग्रीसमध्ये रविवार सार्वमत

  • Share this:

greece

30 जून : युरोपिअन महासंघात रहायचं की नाही, यावर ग्रीसमध्ये रविवारी सार्वमत घेतलं जाणार आहे. बहुतांश ग्रीक नागरिकांना महासंघात रहायचं आहे. त्यामुळे कर्जपुरवठादारांशी वाटाघाटी करण्यात ग्रीस सरकारला मोठं भांडवल मिळालं आहे.

दिवाळखोरीला आलेल्या ग्रीसमुळे युरोपियन महासंघावर सध्या आर्थिक संकट घोंगावत आहे. ग्रीस सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून चालला आहे. आधीच ग्रीसने अनेक युरोपिअन देशांकडून कर्ज घेतलं आहे. ते कर्ज त्या देशाला फेडता येत नसल्याने ग्रीसने वाढीव कर्ज आणि मुदत मागितलीये. पण, अर्थव्यवस्थेत सुधारणा करणार नसाल तर वाढीव कर्ज मिळणार नाही, असं या देशांनी स्पष्ट केलं. याचा परिणाम म्हणजे काल जगातल्या अनेक शेअर बाजारांमध्ये घसरण पहायला मिळाली.

ग्रीसच्या बँकांकडे खातेदारांना रोख देण्यासाठी सिस्टिममध्ये रोखच नाहीय. ग्रीसमध्ये सर्व सरकारी बँका सहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात येतील अशी घोषणा सोमवारी करण्यात आली. याचे पडसाद भारतासह आशियातील सर्व प्रमुख शेअर बाजारांवर दिसून आले. दरम्यान, अर्थव्यवस्थेत मोठ्या सुधारणा करा आणि कर वाढवा, या कर्जपुरवठादारांच्या प्रमुख मागण्या ग्रीसनं आतापर्यंत सातत्यानं धुडकावून लावल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: June 30, 2015, 3:44 PM IST

ताज्या बातम्या