मॅगी निर्यातीला हायकोर्टाचा हिरवा कंदील

मॅगी निर्यातीला हायकोर्टाचा हिरवा कंदील

  • Share this:

maggi

30 जून : मॅगीवर बंदी आल्याने हजारो कोटी रुपयांचे नुकसान झालेल्या नॅस्लेला मंगळवारी मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला. हायकोर्टाने मॅगीची परदेशात निर्यात करण्यास नॅस्लेला परवानगी दिली आहे.

नेस्ले कंपनीच्या मॅगीमध्ये शिशाचं अतिरिक्त प्रमाण आढळल्यामुळे देशाच्या विविध राज्यांमध्ये मॅगीचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदी विरोधात नॅस्लेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (मंगळवारी) सुनावणी झाली. आत्तापर्यंत मॅगीची 17 कोटी पॅकेट्स नष्ट करण्यात आली आहेत. पण परदेशात मॅगीवर आक्षेप नसेल तर नॅस्लेने देशातील मॅगी नष्ट करण्याऐवजी त्याची निर्यात परदेशात करावी असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहे.

कोर्टाने मॅगीच्या निर्यातीवरची बंदी उठवल्यामुळे नेस्लेला दिलासा मिळालाय. पण, महाराष्ट्रात मॅगीवर बंदी कायम आहे. आता याबाबतची सुनावणी येत्या 14 जुलैला होणार आहे. दरम्यान, मॅगीपाठोपाठ आणखी तीन नुडल्स कंपन्यांच्या नुडल्सवरही बंदी घालण्याचे एफएसएसआयचे आदेश आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: June 30, 2015, 2:38 PM IST

ताज्या बातम्या