आजचा दिवस एक सेकंदानं मोठा

आजचा दिवस एक सेकंदानं मोठा

  • Share this:

one secound30 जून : आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा थोडा वेगळा आहे, आजचा दिवस एक सेकंदानी मोठा आहे. नासाच्या माहितीनुसार आज 30 जून हा दिवस सामान्य दिवसांपेक्षा एका सेकंदानी जास्त असेल.

नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरच्या माहितीनुसार पृथ्वीची भ्रमणगती थोडी मंदावली आहे. यामुळे एका सेकंदानी फरक पडेल. या एका सेकंदाला लीप सेकंदामध्ये मोजलं जाणार आहे. एक दिवसात 86 हजार 400 सेकंद असतात. 30 जूनला 11 वाजून 59 मिनिट 59 सेकंद युटीसीवर हे एक सेकंद जोडले जाणार आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार एक सेकंदानी दिवस मोठा असल्याने संगणकांना नुकसान होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

First published: June 30, 2015, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading