सोलापुरात सहकारमंत्र्यांची गाडी अडवणार्‍या शेतकर्‍यांवर लाठीमार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2015 04:50 PM IST

सोलापुरात सहकारमंत्र्यांची गाडी अडवणार्‍या शेतकर्‍यांवर लाठीमार

solapur dhda

29 जून : ऊसदराच्या प्रश्नावर सरकार जबाबदारी ढकलत असल्याच्या निषेधार्थ जनहित शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज (सोमवारी) सोलापुरात सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलकांना रोखण्यासाठी थेट लाठीमार करण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.

चंद्रकांत पाटील आणि सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी पाटील यांचे आगमन होताच शेतकरी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारच्या विरोधात घोषाणाबाजी केली. त्याचबरोबर त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलक कार्यकर्त्यांवर थेट लाठीमार करून त्यांना ताब्यात घेतले. सोलापूर जिल्ह्यात एफआरपी दर दिलेला नाही, तो व्याजासह द्यावा, अशी या आंदोलकांची मागणी आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2015 04:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...