जळगावात अंगणवाडीतील पोषण आहारात सापडली धातूची पट्टी!

जळगावात अंगणवाडीतील पोषण आहारात सापडली धातूची पट्टी!

  • Share this:

Jalgao anganwadi

28 जून : सध्या राज्यात चिक्की खरेदी घोटाळा गाजत असतानाच अंगणवाडीतला भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात एका अंगणवाडीत शालेय पोषण आहारात दिल्या जाणार्‍या चिक्कीत ब्लेड सदृश्य धातूची पट्टी आढळली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

चोपडा तालुक्यातील धानोरा गावात ही अंगणवाडी आहे. या अंगणवाडीत शिकणारी 2 वर्षांची रितिका धनगर खाता खाता अचानक रडू लागली. अंगणवाडी सेविकेच्या हे लक्षात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. निकृष्ट दर्जाच्या चिक्कीत वाळू सापडल्यामुळे पालकांमध्ये घबराट उडाली आहे पण प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्त आहे. विद्यार्थिनी रडू लागल्यानं हा प्रकार उघड झाला, मात्र उच्च अधिकार्‍यांनी अजूनही दखल घेतली नाही.

Follow @ibnlokmattv

First published: June 28, 2015, 6:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading