सत्ता युतीची मग मुंबई तुंबण्याला फक्त शिवसेनाच जबाबदार कशी - राहुल शेवाळे

सत्ता युतीची मग मुंबई तुंबण्याला फक्त शिवसेनाच जबाबदार कशी - राहुल शेवाळे

  • Share this:

rahul shevale and kirit somaiya

28 जून : देशात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपा युतीची सत्ता आहे. मग मुंबई तुंबण्याला फक्त शिवसेनाच जबाबदार कशी, असा सावाल करत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सोमैयांवर पलटवार केला आहे.

पहिल्याच पावसात मुंबई तुंबण्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत नालेसफाईवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे. भाजपचे खासदार किरीट सौमय्यांनी एक पाऊल पुढे टाकत याबाबत कंत्राटदारांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

त्यावर प्रतिक्रिया देताना, पोलिसांकडे तक्रार करून जनतेची दिशाभूल करू नका राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यावर देखील ही जबाबदारी येते कारण ते देखील स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख आहेत. त्यामुळे भाजपच्या खासदारांनी आरोप करताना जबाबदारीच भान ठेवावं असा टोला खासदार शेवाळे यांनी सोमैयांना लगावला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: June 28, 2015, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading