आघाडीच्या काळात 37 कोटींच्या 'चिक्की'साठी भाजपची लॉबिंग ?

  • Share this:

pankjamundechikkiscam227 जून : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यातला चिक्की घोटाळा गाजत असताना 'चिक्की'च्या संदर्भात नवनवे खुलासे होत आहेत. चिक्की घोटाळ्यावरून या आधीच्या आघाडी सरकारमध्ये आदिवासी विभागाकडून सुर्यकांता संस्थेला चिक्कीचं 37 कोटी रुपयांचं कंत्राट बहाल करण्यात आलं होतं. या कंत्राटावरून त्यावेळी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात वाद झाला होता. पण, भाजप नेत्यांची यासाठी लॉबिंग केली होती.

2013 मध्ये तत्कालिन आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांनी स्वतःचे अधिकार वापरुन सुर्यकांता बचत संस्थेला 37.07 कोटी रुपयांचे चिक्कीचं कंत्राट दिलं होतं. पण, तेव्हा आदिवासी विकास राज्यमंत्री म्हणून मी आणि तेव्हाच्या आदिवासी विकास आयुक्त राधिका रस्तोगी यांनी विरोध केल्याचं राजेंद्र गावित यांनी सांगितलंय.

त्यामुळे रस्तोगी यांच्या अभिप्रायानुसार तेव्हाचं चिक्कीचं कंत्राट स्थगित झालं होतं. पण सुर्यकांताच्या बाजुनं लॉबिंग करताना विरोधी पक्षातल्या सेना भाजपच्या आमदारांनी स्थगितीची चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती.

त्यावर विधान परिषदेत बबन पाचपुते यांनी कंत्राट स्थगित करण्याच्या राधिका रस्तोगी यांच्या निर्णयाची चौकशी लावली, असा आरोप माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी केलाय. यानिमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर शंका उपस्थित केलीय. विशेष म्हणजे सुर्यकांता संस्थाही काँग्रेसच्या नेत्यांची होती.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2015 08:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading