Elec-widget

विदर्भात कृषी कर्जमाफीसाठी काँग्रेसचा धडक महामोर्चा

  • Share this:

congress membership campaign27 जून : शेतकरी कर्जमुक्तीसाठी यवतमाळ इथल्या पिंपरी गावातून आज (शनिवारी) काँग्रेसनं आंदोलन सुरू केलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली फडणवीस सरकार विरोधात महामोर्चा काढण्यात येणार आहे.

या आंदोलनाची जोरदार तयारी यवतमाळ जिल्हा काँग्रेसनी गेले आठ ते दहा दिवसांपासून केलीये. पिंपरीतून या आंदोलनाला सुरूवात झाली. यावेळी अकोला बाजार इथं सभा घेऊन या आंदोलनाची सांगता करण्यात येईल. या आंदोलनात सुमारे 10 हजार शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. या आंदोलनात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे.

 

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2015 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...