S M L

श्रीरामपूरमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत दाम्पत्याचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Jun 26, 2015 12:58 PM IST

श्रीरामपूरमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत दाम्पत्याचा मृत्यू

26 जून : शिर्डी इथल्या श्रीरामपूरमध्ये एका हॉटेलला लागलेल्या आगीत धुरामध्ये गुदमरून एका दाम्पत्याचा दुदैवी अंत झाला. आज (शुक्रवारी) सकाळी येथील निलायम हॉटेलमध्ये ही दुर्घटना घडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

सतिश कुलकर्णी आणि सुमित्रा कुलकर्णी असे आगीत गुदरमरून मरण पावलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे दोघेही महावितरणमध्ये नोकरी करीत होते. सतिश हे महावितरण कार्यालयात अधिकारी असून, त्यांची बदली श्रीरामपूर येथे झाली होती. कामावर रूजू होण्यासाठी ते येथे आले होते. मात्र, घर ताब्यात न मिळाल्याने त्यांनी निलायम हॉटेलमध्ये मुक्काम केला होता.

आज सकाळी अचानक या हॉटेलला आग लागली. आगीमुळे हॉटेलमध्ये धुराचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने कुलकर्णी दाम्पत्याचा धुरात गुदमरून मृत्यू झाला. या आगीचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी शॉर्टसर्कीटमुळे आग लागण्ल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2015 12:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close