भाजपचे आमदार कृष्णा खोपडे 7 वी पास पण, शपथपत्रात बी कॉम !

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2015 10:14 PM IST

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे 7 वी पास पण, शपथपत्रात बी कॉम !

krushna khopde324 जून : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पदवीचा वाद सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनीही आपलं शिक्षण लपवल्याचं समोर आलंय. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आपल्या शिक्षणाच्या बाबतीत निवडणूक आयोगाकडे खोटे शपथपत्र सादर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय.

खोपडे खरंतर सातवी पास असून त्यांनी शपथपत्रात बारावी पास आणि बी कॉम प्रथम वर्ष उल्लेख केला होता. त्यामुळे खोपडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

2006 च्या निवडणुकीत खोपडे यांनी आपल्या शपथपत्रात बारावी पास आणि बी कॉम प्रथम वर्ष असा शिक्षणाचा उल्लेख केला होता. पण 2014 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रामध्ये सातवी पास असल्याचे आणि नाईट हायस्कूलमधून शिक्षण झाल्याचे नमूद केले आहे. या दोन्ही शपथपत्रांमध्ये तफावत आहे. आणि खोपडे यांनी निवडणूक आयोगाला वेगवेगळी माहिती देऊन फसवणूक केली आहे, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.

लोंढेंच्या टीकेनंतर कृष्णा खोपडे यांनी नजरचुकीने आपले शिक्षण 12 वी पास आणि बी कॉम प्रथम वर्ष असं लिहलं असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. आपण सातवी पास असल्याचंच खरं असून 12 वी पास नाही असंही खोपडे यांनी सांगितलंय.

दरम्यान, राज्यातील युती सरकारचा बुरखा फाटला असल्याचा आरोप करत सहा महिन्यातच या सरकारमधील नेत्यांच्या बनावट पदवींच्या आणि घोटाळ्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये नैतिकता उरलेली नाही अशी टीका काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2015 10:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close