उस्मानाबाद, परभणीवर वरूणराजे रुसले,बळीराजा चिंतेत

उस्मानाबाद, परभणीवर वरूणराजे रुसले,बळीराजा चिंतेत

  • Share this:

parbahani rain24 जून : मुंबईसह राज्यभरात काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली खरी पण, मराठवाड्यावर वरूणराजे अजूनही रुसलेलेच आहे. मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे पण दुष्काळाच्या झळाने होरपाळलेल्या उस्मानाबाद, परभणी जिल्ह्याकडं पावसाने पाठ फिरवलीये.

उस्मानाबादमध्ये पावसाचं आगमन होऊन 15 दिवस लोटला तरी जिल्ह्यात केवळ 74 मिलीमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यात केवळ 4 टक्के पेरण्या झाल्यात. थोड्या फार पावसाच्या जोरावर काही शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे तर बाकी शेतकर्‍यांनी पाऊस पडेल या आशेवरती रान पेरणी साठी तयार करून ठेवली आहेत.

परभणी जिल्ह्यावर मात्र वरूण राजा रुसलाय. जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण होत असून मागच्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. जिल्हाभरात सोसाट्याचा वारा सुटल्याने आभाळ निघून जात आहे. पूर्ण जून महिना संपत आला तरीही जिल्ह्यात केवळ 76 मिमी एवढाच पाऊस झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या 5 लाख हेक्टर क्षेत्रावरील फक्त 40 ते 50 हजार हेक्टर वरच पेरण्या झाल्यात तर ज्या शेतकर्‍यांनी पहिल्या पावसात पेरण्या केल्या त्यांची पिके आता सुकू लागली आहेत. म्हणून, आता शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले असून जिल्ह्यात जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2015 04:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading