दादरमध्ये झाड पडल्याने एकाचा मृत्यू; 3 जणं जखमी

दादरमध्ये झाड पडल्याने एकाचा मृत्यू; 3 जणं जखमी

  • Share this:

DADAR TREE inside

23  जून : मुंबईत काल (सोमवार) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत होता. दादरच्या आगर बाजार परिसरात वडाचं मोठं झाड पडल्याने एकाचं मृत्यू झाला असून 3 जणं जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी केईएम रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मागच्या आठवड्यात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून त्याचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर झालेला पहायला मिळत आहे. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई बरोबरच सर्व उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

दरम्यान, मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून त्याचा परिणाम रस्त्यावरच्या वाहतुकीवर झालेला पहायला मिळत आहे. हिंदमाता, सायन, चेंबूर आणि सांताक्रूझ मिलन सबवेजवळ पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. गांधी मार्केट-माटुंगा, हिंदमाता परिसर जलमय झाला आहे. ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस वे वर कांदिवलीपासून वाहतुकीची कोंडी झाली आहे. भारतमाता, वांद्रे लिकिंग रोड, डॉ ऍनी बेझंट मार्गावरील वरळी पोलीस ठाण्याजवळ झाडे उन्मळून पडली.

  • रायगड जिल्ह्यासह खोपोली, महाड, उरण,पेण येथेही पावसाला सुरुवात
  • हिंदमाता, सायन, चेंबूर आणि सांताक्रूझ मिलन सबवेला पाणी साचण्यास सुरवात झाली आहे.
  • दादर परिसरात मुसळधार पाऊस, माटुंगा गांधी मार्केट, हिंदमाता परिसर जलमय
  • पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी, पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवलीपासून वाहतुकीची कोंडी.
  • पश्चिम, हार्बर मार्गावरील वाहतूक 15 मिनिटे उशिराने
  • मुंबईतील काही सखल भागातही पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने रस्त्यावरच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

First published: June 23, 2015, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading