विनोद तावडेंवर पदवी बोगस असल्याचा आरोप

  • Share this:

vinod tawade on ncp22 जून : पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची पदवी बोगस असल्याचा आरोप झाला होता. आता राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावरही त्यांच्या शैक्षणिक पात्रता बोगस असल्याच्या आरोपामुळे गोंधळ उडालाय. तावडे यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून घेतलेली पदवी बोगस असल्याचा आरोप तावडेंवर करण्यात आलाय. मात्र, तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझी पदवी बोगस नसल्याचा दावा केलाय.

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्र तोमर यांना बोगस डिग्रीमुळे तुरुंगात जावं लागलं. बोगस डिग्री प्रकरणी एका मंत्र्यांला अटक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात नंतर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची बोगस पदवी असल्याचा आरोप झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. आता त्यापाठोपाठ शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंचं बोगस पदवी प्रकरणात नाव पुढे आल्यामुळे एकच कल्लोळ उडालाय. विनोद तावडे यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून पदवी घेतली.

मात्र, ज्ञानेश्वर विद्यापीठाला मान्यता नाही. त्यामुळे तावडेंची पदवीही बोगस असल्याचा आरोप झाला. या आरोपानंतर विनोद तावडेंनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन आरोपाचं खंडन केलंय. पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे. मला त्याचा गर्व आहे. त्या विद्यापीठात मी घेतलेली पदवी कधीही लपवलेली नाही. माझ्या प्रतिज्ञापत्रात ही पदवी मी स्पष्टपणे लिहिलेली असल्याची माहिती तावडेंनी दिली.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळावा म्हणून ज्ञानेश्वर विद्यापीठ, पुणे यांच्या सप्रे व इतर सरांनी एक ब्रिज कोर्स सुरू केला होता. या कोर्सला मी 1980 मध्ये प्रवेश घेतला. हा कोर्स अर्धवेळ शिक्षण आणि अर्धवेळ इंटर्नशिप असा होता. मी 1984ला हा कोर्स करून पास झाला. असल्याची माहितीही तावडे यांनी दिलीय. या कोर्सला शासन मान्यता नसल्याने मी कधीही पासपोर्टसाठी पदवीधारकांना असणारे लाभ घेतलेले नाहीत. ना मी कधी स्वतःची पदवीधारक मतदार म्हणून नोंदणी केली आहे असा खुलासाही तावडेंनी केला.

Follow @ibnlokmattv

First published: June 22, 2015, 6:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading