S M L

अफगाणिस्तानच्या संसदेवर दहशतवादी हल्ला

Samruddha Bhambure | Updated On: Jun 22, 2015 05:05 PM IST

अफगाणिस्तानच्या संसदेवर दहशतवादी हल्ला

22 जून  :अफगाणिस्तानच्या संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. संसदेच्या इमारतीत आणि आवारात दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोट घडवले आहेत. या स्फोटांनी संपूर्ण काबूल शहर हादरले आहे.

काबूलमध्ये असलेल्या संसदेच्या इमारतीमध्ये आणि इमारतीच्या आवारात एकूण 9 स्फोट झाल्याची माहिती आहे. तालिबानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अफगणिस्तानचे संरक्षणमंत्री झबिनुल्ला मुजाहिद हे हल्ल्याचं लक्ष्य असल्यानं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दुपारी बाराच्या सुमारास संसदेत पहिला स्फोट झाल्याची माहिती आहे. संसदेत अजूनही काही हल्लेखोर गोळीबार करत असल्याचही सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तान लष्कर आणि पोलीस संसद भवनाजवळ दाखल झाले असून, आतमध्ये अडकलेल्या खासदारांना आणि पत्रकारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात त्यांना यश आलं आहे. या हल्ल्यात 21 जणं जखमी झाले असून, यात 5 महिलांसह 3 मुलांचाही समावेश आहे. काही खासदार किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

संसदेच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये पहिला स्फोट झाल्याची माहिती काबूल पोलीस प्रमुख अब्दुल रहमान राहिमी यांनी दिली आहे. अजूनही संसदेच्या आतमध्ये तीन ते चार हल्लेखोर असून गोळीबार सुरू आहे.

Loading...
Loading...

दरम्यान, अफगणिस्तानच्या संसदेवरच्या हल्ल्याबाबत इशारा देण्यात आला होता, असं अफगणिस्तानमधले खासदार हरीफ रहमानी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या आसपासच्या इमारतींचं या हल्ल्यामुळे नुकसान झालं आहे, पण आतापर्यंत जीवितहानी झालेली नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2015 01:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close