शालेय अभ्यासक्रमामध्ये योगाचे धडे आणण्याचा विचार- विनोद तावडे

शालेय अभ्यासक्रमामध्ये योगाचे धडे आणण्याचा विचार- विनोद तावडे

  • Share this:

Vinod tawade

21 जून : शालेय अभ्यासक्रमामध्ये योगाचे धडे आणण्याचा सरकार विचार करत आहे. याबाबत शिक्षणतज्ज्ञ, योगतज्ज्ञ आणि संबंधितांशी सविस्तर चर्चा करुन त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (रविवारी) सांगितलं.

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने विलेपार्ले पूर्व येथील मुंबई महापालिकेच्या दीक्षित शाळेमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. यावेळी इथे आयोजित कार्यशाळेत सहभागी होत त्यांनी स्वत: शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर योगासने केली. यावेळी आमदार पराग आळवणी तसंच शाळेतील शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तावडे म्हणाले, की, योगाभ्यास हा लहान वयापासून सुरू केल्यास त्याचं जस्त महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केल्याने त्यांना आपल्या अभ्यासावर आणि वाचनावर अधिक जास्त प्रमाणात लक्ष केंद्रीत करता येईल, त्याचा त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होईल. योगा हे एक शिक्षण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाचं महत्त्व आता जगाला कळलं आहे. योगाचे धडे अभ्यासक्रमामध्ये आणण्याबाबत आमचा विचार सुरू आहे, त्यादृष्टीने संबंधितांशी चर्चाही सुरू आहे.

शाळांमध्ये असलेल्या शारीरिक शिक्षणाच्या तासामध्ये योगाभ्यास सुरू करता येईल का, याबाबतही विचार विनीमय सुरू आहे, लवकरच याबाबत आम्ही निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्रात योगपर्व सुरू झालं आहे. युवा पिढीसाठी योगा नक्कीच उपयोगी असेल, त्यामुळे आम्ही जनसामान्यापर्यंत योगाचा प्रचार आणि प्रसार करू. शिक्षक, पालकांनाही योगाचे महत्त्व पटवून देऊ असंही तावडे यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2015 01:40 PM IST

ताज्या बातम्या