जगभरातील 177 देशांनी केला योगाभ्यास

जगभरातील 177 देशांनी केला योगाभ्यास

  • Share this:

forreingn yoga

21  जून : भारतीय संस्कृतीची जागतिक ओळख असलेला योग आज, रविवारी भारतीय सीमा ओलांडून जगभरात पोहोचला आहे. भारतासह संपूर्ण जगभरात आज (रविवारी) पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे.

भारताबरोबरच जगभरात पहिला जागतिक योग दिनाचा उत्साह पाहायला मिळत असून, एकूण 191 देशांमध्ये आज पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. हाँगकाँग, सिडनी, तैवान, मलेशिया थायलंड, फिलिपाईन्स यांच्यासह अनेक देशात योग दिन साजरा करण्यात आला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि श्री. श्री रविशंकर न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात योग दिन साजरा करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे. तर अरूण जेटली सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये योग दिन साजरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यादरम्यान संयुक्त राष्ट्राने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केलाय.

Follow @ibnlokmattv

First published: June 21, 2015, 12:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading