मुख्यंमंत्र्यांनी नागपुरात साजरा केला योग दिन

मुख्यंमंत्र्यांनी नागपुरात साजरा केला योग दिन

  • Share this:

Fadnavis doing yoga

21 जून : मुंबईसह नागपुरात आज जागतिक योग दिन मोठया उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात योग दिन साजरा केला. नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर 21 हजार लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत योगाभ्यास केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी योग केला. त्यानंतर मुख्यमंत्री नागपूरच्या सेंट्रल जेलमधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तिथे कैद्यांसाठी खास योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

महाराष्ट्रातल्या सगळ्या कारागृहांमध्ये एक तास योगाभ्यास करण्यात येईल अशी माहिती आज मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच ज्या कैद्यांचं खातं नाही अशा कैद्यांसाठी जनधन योजनेअंतर्गत खातं उघडून देणार अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, जागतिक योग दिनानिमित्त आज मरीन ड्राईव्हसह मुंबईत अनेक ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे नेते अनंत गीते आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक लोकांनी योगसाधना केली.

Follow @ibnlokmattv

First published: June 21, 2015, 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading