जहरीला प्याला, मालवणी विषारी दारूकांडातील बळींची संख्या 102 वर

जहरीला प्याला, मालवणी विषारी दारूकांडातील बळींची संख्या 102 वर

  • Share this:

malvani poisen drink22 जून :मुंबईतील विषारी दारूकांडातील बळींचा आकडा वाढतच असून आज बळींची संख्या 102 वर पोहोचली आहे. अत्यवस्थ असलेले 45 जण अद्याप विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

मागील आठवड्यात बुधवारी रात्री मालाडच्या मालवणी येथील दारूच्या गुत्त्यातून गावठी दारू प्राशन केल्यानंतर काही मजुरांना आणि रिक्षाचालकांना गुरुवारी पहाटेपासून मळमळ आणि उलटय़ांचा त्रास सुरू झाला. त्यांना कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात (शताब्दी रुग्णालयात) दाखल करण्यात आले. मात्र, एकापाठोपाठ एक रुग्ण दगावू लागले. शताब्दी रुग्णालयातील अपुरे बेड आणि डायलिसिसची व्यवस्था नसल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले.

गुरुवारी रात्री बळींची संख्या 13 होती, परंतु शुक्रवारी संध्याकाळपर्यंत त्यात वाढ होऊन 53 एवढी झाली आहे. रविवारी संध्याकाळी ही संख्या 97 वर पोहचली होती. आज सोमवारी मृतांची संख्येनं 100 चा आकडा पार केला.

कारवाईचा बडगा

या दुर्घटनाप्रकरणात दुर्लक्ष केल्याच्या आरोपांखाली उत्पादन शुल्क विभागाच्या चार अधिकार्‍यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. यामध्ये उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक जगदीश देशमुख, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, कॉन्स्टेबल वर्षा वेंगुलकर आणि धनाजी दळवी यांचा समावेश आहे. या संपूर्ण विभागाची जबाबदारी या अधिकार्‍यांवर असल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीये.

या सर्व अधिकार्‍यांची लवकरच विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी पोलीस आयुक्तांनी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह आठ पोलिसांना निलंबित केलं आहे. याप्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू असला तरी पीडितांच्या कुटुंबांना पोलिसांना माहिती न देण्यासाठी धमकावले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 लाखांची मदत

दरम्यान, महाराष्ट्रात अवैध दारू निर्मिती व विक्री करणार्‍यांना परिणामकारक पायबंद घालण्यासाठी त्यांच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याबाबत शासन विचार करीत आहे. पंढरपूर,नागपूर,तुळजापूर, यवतमाळ आदी ठिकाणी दारू बंदी करावी अशी मागणी आहे. याबाबत मंत्रिमंडळात धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. मालवणी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना माणुसकी व सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून राज्य शासनाने 1 लाखांची मदत केली आहे अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

विषारी दारूकांड प्रकरणी आत्तापर्यंत झालेली कारवाई

- 8 पोलिसांचं निलंबन

– त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक

– 2 पोलीस उपनिरीक्षकांवर कारवाई

– उत्पादन शुल्क विभागाचे 2 निरीक्षक,

2 कर्मचारी निलंबित

– क्राईम ब्रँच युनीट 8 कडे तपास

– आरोपी राजू लंगडासह 6 जणांना अटक

– चौकशीसाठी 20 जण ताब्यात

– गोरेगाव ते दहिसर परिसरातल्या 30 दारुभट्ट्यांवर धाडी

Follow @ibnlokmattv

First published: June 22, 2015, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading