हीच का सुवर्णयुगाची सुरुवात ?

हीच का सुवर्णयुगाची सुरुवात ?

  • Share this:

20 जून : करून दाखवलं ?, नेमकं काय करून दाखवलं असा प्रश्नच कालच्या तुंबलेल्या मुंबईमुळे उपस्थित झालाय. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी साचलं. विशेष म्हणजे शिवसेनेनं 50 व्या वर्षात पदार्पण करतेय. सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश करणार्‍या शिवसेनेनं ठिकठिकाणी पोस्टर्स लावलेत.sena poster

'शुभारंभ एका सुवर्णयुगा'चा असं या पोस्टरवर लिहिलंय. पण, ज्या ठिकाणी पोस्टर्स लावलंय त्या ठिकाणी पाण्याचं तळं साचलंय. मुंबईतील एल्फिन्स्टन रोडवर लावलेलं सेनेचं हे पोस्टर आणि त्याखालीच साचलेलं हे पाणी...शिवसेनेनं पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं आश्वासन दिलेलं होतं. पण ते पाण्यात वाहून गेलंय. पाणी साचल्यामुळे मुंबई शुक्रवारी ठप्प झाली. तिन्हा मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे ठिकठिकाणी तळे निर्माण झाले.

पहिल्याच पावसात पाणी साठणार नाही असा पालिकेचा दावा साफ फोल ठरला. हिंदमाता, लोअर परेल, दादर, डोंबिवली, सायन, कुर्लामध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. विशेष म्हणजे, खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालेसफाईची स्वत:जाऊन पाहणी केली होती. मात्र, ऐन शिवसेनेच्या 50 व्या वर्धापन दिनीच पावसाने सेनेचे गोची केली.

सर्व स्तारातून मुंबई तुंबवून दाखवली अशी टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र, पाणी तुंबण्यास एकटी मुंबई पालिका जबाबदार नाही असं म्हटलंय. सेना एकीकडे आपलं सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. पण, दुसरीकडे मुंबापुरी तंुबापुरी होत होत असल्यामुळे हीच का सुवर्णयुगाची सुरुवात ?, असा प्रश्न उपस्थित झालाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2015 03:13 PM IST

ताज्या बातम्या