मुंबईकरांवर पेट्रोल टंचाईचं संकट ?

मुंबईकरांवर पेट्रोल टंचाईचं संकट ?

  • Share this:

mumbai petrol pump4318 जून : मुंबईकरांसमोर एक नवीन संकट उभे राहणार आहे. ते म्हणजे पेट्रोल टंचाईचे.. मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात 4 दिवसांपूर्वी पेट्रोल पाईप लाईनला आग लागली होती.

त्यामुळे या आगीचे परिणाम आता मुंबईकर जनतेला दिसू लागले आहेत. भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कंपन्यांचे अनेक पेट्रोल पंप कोरडे झाले आहेत.

दोन्ही कंपन्यांचे पेट्रोल विक्रेते मुंबईच्या बाहेरून पेट्रोल आयात करून पुरवठा करीत आहेत. अहमदनगर, मनमाड या शहरातील पेट्रोल डेपो मधून पेट्रोल आणून विकलं जातंय.

या प्रक्रियेला वेळही जास्त लागतो. आणि वडाळा येथील पाईप लाईन केव्हापर्यंत दुरुस्त होईल हे कोणीही सांगत नाहीये. त्यामुळे,पुढील काही दिवसात मोठा पेट्रोल तुटवडा मुंबईत पहायला मिळणार आहे.

Follow @ibnlokmattv

First published: June 18, 2015, 5:14 PM IST

ताज्या बातम्या