भुजबळांच्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टवरही 'एसीबी'चा छापा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2015 07:34 PM IST

भुजबळांच्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टवरही 'एसीबी'चा छापा

ôÍû¯ÖÆü¸ü¾ÖÖêŸÖ 123

17 जून : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना आज एसीबीनं आणखी एक दणका दिला आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी एसीबीने छगन भुजबळ यांच्या वांद्र्यातील मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या कार्यालयांवर बुधवारी छापा टाकला. एसीबीने मंगळवारीच मुंबई, पुणे, नाशिक, मनमाड, येवला इथल्या छगन भुजबळांच्या घरांवर आणि कार्यालय अशा एकून 17 ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला.

या छाप्यामध्ये पुराव्या दृष्टीने उपयुक्त कागदपत्रे किंवा आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या नसल्याचे एसीबीने जरी स्पष्ट केलं असलं तरी विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भुजबळ परिवाराच्या बेहिशोबी मालमत्ते संदर्भात अनेक महत्वाची कागदपत्रं या 'एमईटी'मध्ये मिळाले असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, अँटी करप्शन ब्यूरोच्या झाडाझडती छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांची करोडोंची संपत्ती उघड झाली आहे. त्यामुळे भुजबळ पुरते गोत्यात आले असताना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भुजबळांविरोधात दोन 'इन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट' (ईसीआयआर) दाखल केले आहेत. गुन्हेगारी दंडविधानसंहितेनुसार पोलीसांकडून दाखल करण्यात येणार्‍या एफआयआर इतकंच ईसीआयआरलाही महत्त्व आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यापुढील अडचणीत आणखी भर पडणार आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2015 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...