भुजबळांवरची कारवाई योग्यच - अण्णा हजारे

  • Share this:

anna on kejriwal

17 जून : कायद्यासमोर गरीब, श्रीमंत किंवा अधिकारी, मंत्री सर्व सारखेच असतात असं सांगत एसीबीने केलेली कारवाई योग्यच असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मुंबई विद्यापीठाच्या कलिना भूखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मालमत्तेवर एसीबीनं आज धडक कारवाई केलीये. नाशिक, मनमाड, येवला तसंच मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणच्या तब्बल 16 जागांवर छापे टाकण्यात आले आहे. एसीबीने केलेल्या या कारवाईवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जे मंत्री आणि अधिकारी प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्या बरोबरच त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने सामान्य माणसाचा कायद्यावर विश्वास बसलाय असं स्पष्टीकरणही अण्णांनी दिलं आहे. जनतेचा पैसा लुटणारे तसंच भ्रष्टाचारी माजी मंत्री आणि अधिकारी जेल मध्ये गेले तरच घोटाळे बाजारांवर जरब बसेल असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2015 04:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading