भुजबळांवर होणारी कारवाई सुडबुद्धीने - मधुकरराव पिचड

भुजबळांवर होणारी कारवाई सुडबुद्धीने - मधुकरराव पिचड

  • Share this:

Thumbnails16 जून : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई, नाशिकमधील विविध घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडालीये.

छगन भुजबळ यांच्यावर होणारी कारवाई ही सुडबुद्धीने होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांच्या पाठीशी उभी असल्याचंही पिचडांनी सांगितलंय.

दरम्यान, छगन भुजबळांवर जी काही कारवाई सुरू आहे. ती नियमानुसार असून, कुणाहीविरुद्ध सुडबुद्धीने किंवा आकसाने कारवाई केली जात नाहीये. या कारवाईवर हायकोर्टाचं लक्ष आहे. त्यामुळे आम्ही सूडाने कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: June 16, 2015, 4:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading