नांदेडमध्ये जोडप्याला गावगुंडाकडून बेदम मारहाण

नांदेडमध्ये जोडप्याला गावगुंडाकडून बेदम मारहाण

  • Share this:

nanded marahan16 जून : नांदेडमध्ये एकांतात बसलेल्या जोडप्याला संस्कृतीच्या नावाखाली गावगुंडांनी बेदम मारहाण करुन त्याचा व्हिडिओ आरोपींकडूनच व्हॉट्ऍपवर व्हायरल केला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

अर्धापूर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पीडित तरुणाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर 4 आरोपींना अटक करण्यात आलीये.

अर्धापूर लगतच्या एका शांत ठिकाणी हे जोडपं बसले होते. त्याचवेळी त्यांच्यावर पळत ठेवून असलेले 12 तरुणांचे एक टोळके तिथं पोहोचलं.

प्रथम त्यांनी मारोती राऊत आणि त्याच्या मैत्रिणीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर या टोळक्यातील काही सदस्यांनी मारोती राऊत यास प्रचंड मारहाण केली

. हे टोळकं एवढ्यावरच थांबलं नाही या टोळक्यातील काही नराधमांनी तरूणीला देखील मारहाण करीत तिच्याशी असभ्य वर्तन केलं. हे सर्व करताना आरोपींनी या सर्व घटनेचे चित्रीकरण एका मोबाईलमध्ये केलं. कसेबसे मारोती आणि त्याच्या मैत्रिणीची सुटका झाली.

घडलेला प्रकार त्यांनी आरोपींच्या भीतीने कुणालाच सांगितला नाही. पण सोमवारी संध्याकाळी अचानक घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ व्हॉट्सऍपवर व्हायरल झाला.

पीड़ित युवक आणि युवतीच्या काही परिचितानी हा व्हिडिओ पाहिला. पीडित युवकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठून त्याने तक्रार केली. त्यावरुन अर्धापूर पोलिसांनी रात्री उशिराने गुन्हा केला आणि तातडीने यातील 4 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2015 09:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading