'स्वाभिमानी'चा प्रताप, बँक मॅनेजरच्या श्रीमुखात भडकावली

'स्वाभिमानी'चा प्रताप, बँक मॅनेजरच्या श्रीमुखात भडकावली

  • Share this:

Buldhana swabhhimani thappad

15 जून : कर्ज पुनर्गठन करण्यास नकार देणार्‍या बँक मॅनेजरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीमुखात लगावल्याची घटना बुलढाण्यात घडली. देना बँकेच्या मॅनेजरने कर्ज पुनर्गठन करण्यास नकार दिला होता.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बँकेकडून कर्ज न मिळाल्याने यवतमाळ जिल्ह्यात शेतकर्‍यांनी आत्महत्या केली होती.

पीक कर्ज पुनर्गठन झालं नसल्याने शेतकर्‍यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहेत. मात्र मंत्री आणि नेतेमंडळी फक्त आश्वासनंच देत आहेत. याविषयी महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, अपेक्षा असूनही राष्ट्रीय बँकांचा प्रतिसाद मिळत नाही. याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करू तसंच नाबार्ड आणि रिझर्व बँकेशी चर्चा करून लवकरच शेतकर्‍यांना मदत केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Follow @ibnlokmattv

First published: June 15, 2015, 4:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading