India vs Bangladesh : ‘दिल्लीत दोन आणीबाणी, एक वायू प्रदूषण आणि...’; नेटकऱ्यांची ट्विटरवर फटकेबाजी

India vs Bangladesh : ‘दिल्लीत दोन आणीबाणी, एक वायू प्रदूषण आणि...’; नेटकऱ्यांची ट्विटरवर फटकेबाजी

आपल्या बेजबाबदार खेळीमुळं पुन्हा एकदा भारताचा युवा खेळाडू झाला ट्रोल.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाची युवा ब्रिगेड सपेशल अयशस्वी ठरली. भारताच्या गोलंदाजांना आणि फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं तब्बल दहा वर्षांनी बांगलादेशनं भारतीय संघावर विजय मिळवला. मुशफिकर रहिमच्या अर्धशतकामुळं बांगलादेशनं 7 विकेटनं हा सामना जिंकला.

भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये दीपक चहरनं लिटन दासला माघारी धाडले. त्यानंतर सौम्य सरकार आणि मोहम्मद नैम यांची जोडी चांगली फलंदाजी करत असताना युजवेंद्र चहलनं मोहम्मद नैमला माघारी पाठवले. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांना कमबॅक करता आला नाही. त्यानंतर मुशफिकर रहिम आणि सौम्य सरकार यांनी अर्धशतकी भागिदारी केली. 17व्या ओव्हरमध्ये खलीली अहमदनं सौम्या सरकारला बाद करत भारताला जिंकण्याची संधी दिली, मात्र पुढच्याच ओव्हरमध्ये कृणाल पांड्येच्या एका चुकीमुळं भारतानं सामना गमावला.

बांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. आधीच दिल्लीतील वायू प्रदूषणामुळं मैदानावरील वातावरण धुकरट झाले होते. यामुळं पहिल्याच ओव्हरमध्ये शिखर धवन रनआऊट होता होता वाचला. त्यानंतर लगेचच कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर युवा ब्रिगेडकडे सर्वांचे लक्ष असताना केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि शिवम दुबे यांना चांगली फलंदाजी करता आली नाही.

युवा ब्रिगेड फेल

पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवत टीम इंडियानं युवा खेळाडूंना संघात जागा दिली. मात्र कोणालाही चांगली फलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीली विश्रांती दिल्यामुळं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला केएल राहुल 15 धावा करत बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरनं आक्रमक फलंदाजी करण्यात सुरुवात केली. मात्र सातत्य राखण्यास अपयश आल्यानंतर श्रेयस 22 धावा करत बाद झाला. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा शिवम दुबे फक्त 1 धाव करत बाद झाला.

पंतला नक्की झालयं काय?

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली जागा गमावलेल्या ऋषभ पंतला टी-20 क्रिकेटमध्ये स्थान कायम राखावे लागणार आहे. मात्र पहिल्या टी-20 सामन्यात ऋषभ पंतला चांगली फलंदाजी करता आली नाही. संथ सुरुवात केलेल्या पंतनं चौकार मारण्यास सुरुवात केली. मात्र 19व्या ओव्हरमध्ये संघाला जास्त धावांची गरज असताना पंत मोठा शॉट मारण्याच्या नादात बाद झाला. त्यामुळं सोशल मीडियावर पुन्हा एकदा पंतला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. .

दिल्लीमध्ये आरोग्य आणीबाणी

दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. याची गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या समितीनं दिल्लीत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणानं (ईपीसीए) प्रदूषण नियंत्रणासाठी पाच नोव्हेंबरपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील बांधकामांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. ताज्या आकड्यांनुसार दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी 1000 अंकांवर पोहचली आहे. दरम्यान, ऊस पडून गेल्यानंतर तो 625 वर पोहचला. ही गोष्ट गंभीर असून आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी प्रदुषणाची पातळी 500 च्या आसपास होती पण हलक्या पावसाने यात वाढ झाली. दिल्लीतील प्रदूषण एवढे जास्त आहे की इंदिरा गांधी विमातळावरून 32 विमानांची दिशा बदलण्यात आली आहे.

First published: November 4, 2019, 8:10 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading