12 जून : वसई विरार महापालिका निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावल्यात. येत्या रविवारी 115 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे.
वसईमध्ये 115 प्रभागांसाठी 367 उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकुर विरूद्ध इतर सर्व पक्ष असा हा सामना होणार आहे. शिवसेनेने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे.
पण महायुतीच्या भाजप आणि माजी आमदार विवेक पंडित यांचा जनआंदोलन पक्षं प्रमुख प्रतिस्पर्धी असणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रचार फारसा दिसुन आला नाही. त्यामुळे वसई विरार पालिकेवर झेंडा कोण फडकावतं हे पाहण्याचं ठरणार आहे.
वसई विरार महानगरपालिका निवडणूक
एकूण मतदार 06,76,639
एकूण प्रभाग 115
एकूण उमेदवार 367
एकूण मतदान केंद्र 607
संवेदनशील मतदान केंद्र 117
पोलीस बंदोबस्त
एकूण पोलिस कर्मचारी 2000
2 दंगल नियंत्रण पथक
प्रमुख लढत
बहुजन विकास आघाडी आरपीआय (A)
विरुद्ध
शिवसेना, भाजप आणि जनआंदोलन पक्ष
Follow @ibnlokmattv |