डिसेंबरपर्यंत रिलायन्सचा 4 हजारांमध्ये 4 जी फोन बाजारात !

डिसेंबरपर्यंत रिलायन्सचा 4 हजारांमध्ये 4 जी फोन बाजारात !

  • Share this:

mukesh ambani 433212 जून : टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्सने आता आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. स्मार्ट फोन मार्केटची चलती पाहता रिलायन्स लवकरच स्वस्तात मस्त असा 4 जी फोन डिसेंबरपर्यंत बाजारात आणणार आहे. अवघ्या चार हजारांमध्ये मोबाईलधारकांच्या हाती हा 4 जी फोन पडणार आहे.

रिलायन्स इंड्रस्टीज लिमिटेडची 41 वी सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) मुंबईत पार पडली. यावेळी चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अनेक योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी महत्वाकांक्षी जियो प्रकल्पावर भर दिला. या प्रकल्पाअंतर्गत येत्या डिसेंबरपर्यंत फोरजी सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसंच फोरजीचा लाभ घेण्यासाठी स्वस्तात मस्त असा 4 जी फोन लाँच करण्यात येणार आहे. त्याची किंमत सर्वसामान्य ग्राहकांनीही परवडेल अशीच असणार आहे. अवघ्या 4 हजारांच्या आत हा फोन उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. तसंच रिलायन्स जियो फोरजीची सेवा येत्या डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीये.

Follow @ibnlokmattv

First published: June 12, 2015, 5:09 PM IST

ताज्या बातम्या