पालघरमध्ये भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2015 05:46 PM IST

पालघरमध्ये भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू

12 जून : पालघर- वाडा शहरातील पाटील आळी येथे काल (गुरूवारी) रात्री 7 च्या सुमारास पावसामुळे अंगावर भिंत कोसळून एका मुलीचा जागीच मृत्यू झाला असून एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

सोनाली हरिशंकर चव्हाण असं मृत मुलीचे नाव असून ती आपली चूलत बहिण सोनम हिच्यासोबत आपल्या घरापासून जवळच असलेल्या मामाकडे जात असताना वाटेत सुबोध वेखंडे याचं पडक घर आहे. पावसामुळे या घराची भिंती कोसळून ही घटना घडली आहे. या घटनेत सोनम जयशंकर चव्हाण ही गंभीर जखमी असून तिच्यावर ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मृत सोनाली यंदाच 75 टक्के मिळवून दहावी पास झाली होती. सोनाली आपल्या मामाकडे पेढे घेवून जात असताना घटना घडली आहे. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2015 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close