11 जून : जेजुरीजवळ एका एस.टी. बस ला अपघात झालाय. ही बस भिवंडीवरून गाणगापुरला जात होती. या बसचं पुढचं टायर फुटल्यामुळे या बसला अपघात झाला. या अपघातात 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले.
अपघातातील सहा जखमींना जेजुरीत प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आलंय. तर अन्य 20 जखमींना पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आलंय. एसटीचे चालक वाहक देखील जखमी झाले आहेत. कोणत्याही प्रवाशाच्या जीवितास धोका नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
Follow @ibnlokmattv |
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा