अग्नितांडव थांबले, पालघरमधील रबर कंपनीची आग आटोक्यात

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2015 06:51 PM IST

अग्नितांडव थांबले, पालघरमधील रबर कंपनीची आग आटोक्यात

palghar fire11 जून : पालघर जिल्हातील वाडा तालुक्यातील पाली-विक्रमगड मार्गावरील टीना रबर इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला लागलेली भीषण आग तब्बल सात तासांनी आटोक्यात आली आहे. सकाळी 9 वाजताच्या सुमारास कंपनीच्या स्टोअर रुमला आग लागल्यानंतर काही वेळेतच आगीने रौद्र रुप धारण केलं.

आगीचे स्वरूप इतकं भीषण होतं की, आगीचे लोन आसपासच्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर पसरलं होतं. आग शार्टसर्किटमुळेलागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अग्निशमक दलाच्या 5 गाड्यांनी तब्बल सात तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान, या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2015 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...