'आरे'बाबत अफवा पसरवू नका, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं

'आरे'बाबत अफवा पसरवू नका, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं

  • Share this:

cm vs khadse on aare10 जून : आरे कॉलनीतील जागा मेट्रो कारशेडला देण्याचा निर्णय घेतला असल्याचं दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. याला काही वेळ होत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करुन असा कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू असं ट्विट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्वात ज्येष्ठ मंत्री एकनाथ ख़डसे यांच्यात एकवाक्यता नाही हे स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ ख़डसे यांच्यामध्ये असलेलं कुरघोडीचं राजकारण पुन्हा एकदा समोर आलंय.

मुंबईत गोरेगावमध्ये आरे कॉलनीत मेट्रो 3 साठी कारशेड प्रकल्पामुळे 2 हजारांपेक्षा जास्त झाडांची कत्तल होणार होती. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याला कडाडून विरोध करत आंदोलनं केली. एवढंच नाहीतर मनसे आणि शिवसेनेनंही विरोध केला. पण, आज एकनाथ खडसे यांनी मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार असं जाहीर करून टाकलं.

एकनाथ खडसे म्हणतात, "आज आरे संदर्भात बैठक झाली. मेट्रोच्या प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील 30 हेक्टर जागा देण्याचं ठरवलं आहे. हा निर्णय आघाडी सरकारने जुलै 2014 मध्ये घेतला होता. मात्र, जागा अजून त्यांच्या ताब्यात दिलेली नाही, पर्यावरण आणि अन्य व्यक्तीचा त्याला विरोध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं आहेत, या झाडांची कत्तल होईल अशी भीती आहे, आज या संदर्भात एमएमआरडीएचे अधिकारी, आरेचे अधिकारी यांच्यासमवेत पाहणी केली, चर्चा केली. या ठिकाणी जेवढी झाड आहे, त्यापेक्षा तिपट्ट झाडे लावली पाहिजे, जगवली पाहिजे, जी हानी होईल ती भरुन दिली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना दिल्या. एमएमआरडीएने तिपट्ट झाड लावण्याचा, जगवण्याचं लेखी स्वरुपात लिहून दिलं आहे. दुसरी मोठी जागा मुंबईत उपलब्ध नाही, त्यामुळे झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घावा लागला.

मुख्यमंत्र्यांची गुगली

पण, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका असं ट्विट करून खडसेंची घोषणा खोडून काढली. मुख्यमंत्री म्हणतात, आरेची जमीन मेट्रो कारशेडला देण्याबाबत असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका.

खडसेंचं घुमजाव आणि खुलासा मेट्रो कारशेडची जागा देण्याचा निर्णय आघाडी सरकारनं 5 मार्च 2014 ला घेतला होता. आम्ही जागेचा ताबा दिला नाही. आम्ही फेर तपासणीसाठी समिती नेमली आहे. समिती निर्णय घेईल. मी, काय बोललो याबद्दल मीडियाने चुकीच्या पद्धतीने दाखवलं. मी, माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मेट्रो कारशेडचा निर्णय झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर बातमी पाहून ट्विट केलं असेल पण, आमच्या कोणतेही मतभेद नाही. कुणी काहीही केलं तरी मतभेद होणार नाही असा दावाही खडसेंनी केला.

 

 

Follow @ibnlokmattv

First published: June 10, 2015, 10:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading