साखर कारखान्यांना 6 हजार कोटींचं बिनव्याजी कर्ज - नितीन गडकरी

साखर कारखान्यांना 6 हजार कोटींचं बिनव्याजी कर्ज - नितीन गडकरी

  • Share this:

sigarcane

10 जून : देशभरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारनं देशातल्या साखर कारखान्यांना 6 हजार कोटीचं बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.

ही रक्कम कारखान्यांना मिळणार नसून, ती थेटपणे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे केंद्री मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्री मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशभरातील साखर कारखान्यांसाठी हे कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची थकीत देणी अदा करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या होत्या.

Follow @ibnlokmattv

First published: June 10, 2015, 2:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading