राज्याचे ऍडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांचा राजीनामा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2015 04:34 PM IST

राज्याचे  ऍडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांचा राजीनामा

sunil mahohars

09 जून : भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या ऍडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केलेला असून, त्यांच्या जागी केंद्र सरकारचे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे प्रभारी ऍडव्होकेट जनरल म्हणून काम पाहतील.

आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुनील मनोहर यांच्या राजीनाम्याचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मांडला. व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा दिला असल्याचे सुनील मनोहर यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटलं आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 नोव्हेंबर रोजी सुनील मनोहर यांची ऍडव्होकेट जनरल नियुक्ती केली होती. गेल्या सहा महिन्यात त्यांनी राज्य सरकारची बाजू हायकोर्टात चांगलीच लावून धरली आहे.

देवेंद्र फडणवीस सरकार विश्वास दर्शक ठराव, गोवंश हत्याबंदी कायदा, सिंटन घोटाळा अशा अनेक प्रकरणांमध्ये सुनील मनोहर यांनी सरकारची बाजू उत्तमरित्या मांडली. पण मध्येच एकाएकी सुनिल मनोहर यांनी राजीनामा दिला आहे.

Loading...

दरम्यान, या मागे मनोहर कुटूंबियांच्या सर्वपक्षीय चांगल्या संबंधांमुळे मनोहर यांच्या कामात अडचण येत असल्याच्या कारणाचीही चर्चा आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2015 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...