नेस्लेविरोधात याचिका दाखल ; बिग बी, माधुरीचाही समावेश

नेस्लेविरोधात याचिका दाखल ; बिग बी, माधुरीचाही समावेश

  • Share this:

maggi add 4308 जून : मॅगीची उत्पादक कंपनी असलेल्या नेस्लेविरोधात मुंबईतल्या अंधेरीतल्या न्यायदंडाधिकार्‍याकडे याचिका दाखल केलीये. वॉचडॉग फाऊंडेशन या संस्थेनं ही याचिका दाखल केलीये. नेस्ले कंपनीचे 9 संचालक तसेच मॅगीचे ब्रँड ऍम्बेसेडर असलेले अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांचाही या याचिकेत समावेश करण्यात आला आहे.

मॅगीमध्ये शिशाचं प्रमाण जास्त आढळल्यामुळे देशभरात विविध ठिकाणी बंदी घालण्यात आलीये. दिल्ली, हरियाणा, केरळ पाठोपाठ महाराष्ट्रातही मॅगीवर बंदी घालण्यात आलीये. मॅगी विरोधात सरकारने अजून कोणतेही कठोर पाऊल उचलले नाही. मात्र, मॅगीच्या विरोधात आता याचिका दाखल झालीये. मॅगीची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्याविरोधात बिहारमध्ये गुन्हे दाखल झाले आहे. आता नेस्ले विरोधात याचिका दाखल करण्यात आलीये. यात अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांचा उल्लेख आहे. मॅगीमध्ये हानीकारक पदार्थ असल्यानं तो खाण्यास अपायकारक आहेत असं याचिकेत म्हणण्यात आलंय. या याचिकेवर 30 जूनला पहिली सुनावणी होणार आहे.

Follow @ibnlokmattv

First published: June 8, 2015, 9:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading