S M L

नांदेडमध्ये वर्‍हाडाच्या बसला भीषण अपघात, 9 जण जागीच ठार

Sachin Salve | Updated On: Jun 6, 2015 01:00 PM IST

नांदेडमध्ये वर्‍हाडाच्या बसला भीषण अपघात, 9 जण जागीच ठार

06 जून : नांदेड जिल्ह्यातील बारड येथून लग्नाला जाणार्‍या वर्‍हाडाच्या मिनीबसला समोरुन येणार्‍या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नऊ जण ठार तर 16 जण जखमी झाले. तर सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काल रात्री साडेबाराच्या सुमाराला नांदेड विद्यापीठाजवळ हा अपघात झालाय. अपघातातल्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

बराड येथील सहारे कुटुंबिय लग्नासाठी कर्नाटक राज्यतील गुलबर्गा येथे निघाले होते. दोन मिनीबसमध्ये वर्‍हाडीमंडळी जात असतांना नांदेड शहरालगत विद्यापीठाजवळ समोरुन येणार्‍या ट्रकने वर्‍हाडींच्या मिनीबसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की मिनिबसचा वरील भाग अक्षरश: 100 फूट लांब उडून पडला. या भीषण अपघातात बसमधील नऊ जण जागेवरच ठार झाले. तर 16 जण जखमी झाले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2015 01:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close