महापौर बंगल्याजवळ होणार बाळासाहेबांचं स्मारक?

महापौर बंगल्याजवळ होणार बाळासाहेबांचं स्मारक?

  • Share this:

balasaheb-smarak05 जून : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याजवळील जागा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. त्यामुळं ते परदेश दौर्‍यावरुन परतल्यानंतर, शिवसेनेच्या वर्धापनदिनी म्हणजेच 19 जूनला  शिवसेनेकडून याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाचा मुद्दा पुढे आला होता. त्यासाठी मुंबईतील सहा जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. पण, त्यावर एकमत न झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून स्मारकाच्या जागेचा प्रश्न सुटू शकला नव्हता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2015 01:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading