राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

  • Share this:

pre monsoon rain

05 जून : जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वात जास्त प्रतीक्षा असते ती पावसाच्या आगमनाची. मुंबईसह राज्यात अनेक भागात काल मध्यरात्री मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे.

मान्सूनने श्रीलंकेच्या मध्य भागापर्यंत मजल मारली असून येत्या 24 तासांत केरळमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या काही भागात आज मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला. कोकणातील रायगड जिल्ह्याच्या काही भागांसह मुंबईतही मान्सूनपूर्व पावासाच्या सरी कोसळल्या.

तसंच   पुणे, लोणावळा,सातारा या भागातही पावासाने हजेरी लावली. तर नगर जिल्ह्यातील कर्जत, पाथर्डी या भागात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला. हिंगोलीत सलग दुसर्‍या दिवशी ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.

एकूणच पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरीही मान्सूनपूर्व पावसाने सुखावला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: June 5, 2015, 8:59 AM IST

ताज्या बातम्या