मॅगीच्या वादात शिवसेना सेलिब्रिटींच्या पाठीशी

मॅगीच्या वादात शिवसेना सेलिब्रिटींच्या पाठीशी

  • Share this:

sena suprot celbrt04 जून : देशभरात मॅगीवरून वादंग निर्माण झालाय. मॅगीच्या जाहिरातीमुळे अभिनेते अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहे. मात्र, शिवसेनेनं सेलिब्रिटींची जोरदार पाठराखण केलीये.

मॅगीची जाहिरात करणार्‍या कलाकारांवरुन वाद निर्माण करून मूळ विषयाकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं, असं शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोर्‍हे यांनी म्हटलंय.शिवसेना या कलाकारांच्या पाठीशी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

इतकी वर्ष केंद्र सरकारनं मॅगीबाबत क्वालिटी कंट्रोल का केलं नाही, असा सवालही त्यांनी विचारला आहे. मूळ विषय सोडून अनेकदा असे वाद निर्माण केले जातात, त्यामुळे मूळ विषय मॅगीमधल्या घातक पदार्थांचा आहे, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही नीलम गोर्‍हे यांनी सांगितलं.

मॅगीची जाहिरात केल्यामुळे बिहारमध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमिताभ बच्चन यांनी मॅगीची जाहिरात दोन वर्षांपूर्वीच थांबवली असल्याचं स्पष्ट केलं. तर नेस्लेनं उत्पादनाची खात्री दिली म्हणूनच जाहिरात केली असा खुलासा माधुरीने केलाय. आता शिवसेनेनं या वादात उडी घेतली असून सेलिब्रिटींना साथ दिलीये.

Follow @ibnlokmattv

First published: June 4, 2015, 4:22 PM IST

ताज्या बातम्या