'पीके'चीनला भावला, 11 दिवसांत 83 कोटींची कमाई

Sachin Salve | Updated On: Jun 3, 2015 02:06 PM IST

pk02-oct2303 जून : बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानच्या पीके सिनेमाने नवा विक्रम केलाय. या सिनेमाने जगभरातून 246 कोटींचा गल्ला वसूल केलाय.

चीनमध्ये चायनिज भाषेत डब करून तब्बल 450 थिएटर्समध्ये रिलीज झालेल्या पीकेनं अवघ्या 11 दिवसांत 83 कोटी रूपयांचा गल्ला कमावलाय.

ही घोडदौड अशीच कायम राहिली तर देशाबाहेर 100 कोटी रूपयांचा गल्ला वसूल करणारा तो पहिला सिनेमा ठरेल. पीके या सिनेमाने चीनमध्ये 17 कोटींचं ओपनिंग विकेण्ड कलेक्शन मिळवलं होतं.

त्यामुळे तो देशाबाहेर 100 कोटी रूपये कमावणारा पहिला सिनेमा ठरतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे, आमिर खानने स्वत: चीनमध्ये जाऊन चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2015 02:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close