उन्हाच्या तडाख्यामुळे कोथिंबीर आणि पालेभाज्या महागल्या

उन्हाच्या तडाख्यामुळे कोथिंबीर आणि पालेभाज्या महागल्या

  • Share this:

kothambir03 जून : वाढलेल्या उष्णतेचा परिणाम पालेभाज्या उत्पादनावर दिसू लागला आहे. कोथंबीर आणि मेथी उत्पादन त्यामुळे निम्म्याने घटले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना जुडीला 55 ते 60 रुपयांचा दर मिळतोय.

पुणे जिल्ह्यातील कोथंबीर आणि मेथीची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव बाजार समितीमध्ये हा दर या हंगामातील सर्वाधिक दर आहे. कमी कालावधीत येणारं पिक म्हणून पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोथंबिरीचं पिक घेतले जाते. पण उष्मा वाढल्याने उत्पादन निम्म्याने घटले आहे. आणि त्यामुळे आवक घटली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: June 3, 2015, 1:46 PM IST

ताज्या बातम्या