बेबी पाटणकर प्रकरणी 5 पोलीस अधिकार्‍यांना अटक

  • Share this:

mhapolice30 मे : ड्रग माफिया बेबी पाटणकर प्रकरणी 5 पोलीस अधिकार्‍यांना अटक करण्यात आलीये. वरिष्ठ पो. नि. सुहास गोखले, पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योतिराम माने, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सारंग आणि हेड कॉन्स्टेबल यशवंत पराटे यांना अटक करण्यात आलीये. शुक्रवारी रात्री मुंबई क्राईम ब्रांचनेही धडक कारवाई केलीये.

कोण आहेत सुहास गोखले ?

- 1985 साली मुंबई पोलीस दलात दाखल

- मुंबई पोलीस दलातील भावाच्या अपघाती मृत्यूनं पोलीस दलात सामिल होण्याचा घेतला निर्णय

 - मुंबई पोलीस दलात अनेक विभागात काम

- प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून गोखले यांची ओळख

- मुंबईतील अमली पदार्थविरोधी कारवाया हाती घेतल्या

- आतापर्यंत अनेक ड्रग माफिया आणि ड्रग पेडलर्सवर मोठी कारवाई

- राज्यभरातील पोलीस अधिकार्‍यांना नार्कोटिक्स संदर्भात घेतल्या जाणार्‍या कार्यशाळेत गोखले प्रशिक्षण द्यायचे

- अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार

 - गोखले यांच्या पुढाकाराने मुंबई शहरातील अनेक भागात अँटी ड्रग बिग्रेड स्थापन झाल्या

- एमडी ड्रगला नार्कोटिक्स ऍक्टमध्ये आणण्यात गोखले यांचे मोठे योगदान

 - ड्रगविरोधी जनजागृतीसाठी शाळा आणि कॉलेजेसमध्ये गोखलेंचे लेक्चर

- 12 वर्षांपूर्वी गोखले यांना अर्धांगवायूचा झटका आला होता यामध्ये त्यांनी आपल्या शरीराच्या उजव्या भागावरचे नियंत्रण गमावले

- पण 12 वर्षांपासून आपल्या अपंगत्वावर मात करत आपले काम सुरूच ठेवले होते

खबर्‍यांचे जोरदार नेटवर्क

- 30 वर्षं पोलीस दलात सेवा केल्यानंतर आज ते निवृत्त होणार होते

- याकाळात भ्रष्टाचाराची साधी तक्रारही गोखले यांच्या विरोधात दाखल नाही

Follow @ibnlokmattv

First Published: May 30, 2015 02:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading