शरद पवार 30 मेपासून दुष्काळी भागाच्या दौर्‍यावर

  • Share this:

pawar_on_sena29 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. खरीपाच्या तोंडावर हा दौरा करून शरद पवार शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत.

30, 31 मे आणि 1 जून ला पवारांचा हा दौरा असणार आहे. मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी शऱद पवार करणार आहेत. पवारांबरोबर या दौर्‍यामध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही असणार आहेत.

दरम्यान, शेतकर्‍यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. 30 जून ऐवजी आता 15 जून पर्यंतच हे काम होईल. त्यामुळं नव्या कर्जासाठी शेतकर्‍यांना मदत होणार आहे. व्याजात सवलत देण्यात येणार असून यामुळे कर्ज मिळवण्यासाठी शेतकर्‍यांती पत तयार होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2015 09:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading