मुंबईकरांसाठी हक्काचं फुटबॉल मैदान, जियो पार्कचं शानदार उद्घाटन

मुंबईकरांसाठी हक्काचं फुटबॉल मैदान, जियो पार्कचं शानदार उद्घाटन

  • Share this:

jio park27 मे : मुंबईकरांसाठी एक खुषखबर....आता मुंबईच्या हृदयस्थानी फुटबॉलचं भव्य असं शानदार मैदान असणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त उपक्रमाने 37 हजार स्क्वेअर फूट परिसरात जियो पार्क उभारण्यात आलंय.

बीकेसीमधल्या या पार्कमध्ये फुटबॉलचं मैदान असेल, खेळण्यासाठी बगीचा असेल, तसंच 2 हजार गाड्यांसाठी अंडरग्राउंड पार्किंगही असेल. या संपूर्ण परिसरात वायफायची सोय असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्कचं उद्घाटन केलं.

या शानदार सोहळ्यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, मुकेश अंबानी, नीता अंबानी, रणबीर कपूर, जॉन अब्राहम आणि अनेक मान्यवर तसंच सेलेब्रिटीज उपस्थित होते. विशेष म्हणजे, राज्यातलं हे सगळ्यात मोठं इकोपार्क असणार आहे. इथं दोन हजार झाडं लावण्यात आली आहेत.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2015 10:30 PM IST

ताज्या बातम्या