नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 26, 2015 08:51 PM IST

rape sds

26 मे : नागपूर इथल्या टीबी वॉर्ड परिसरात 17 वर्षांच्या अल्पवायीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. ही घटना रविवारी (ता. 24) रात्री आठ वाजता घडली. कामावरून घरी परत जात असताना चार युवकांनी तिला अडविले. तिच्यासोबत असलेल्या तरुणाला मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

पीडित मुलगी बिल्डरकडे काम करत होती. रात्री सहकारी तरुणासोबत घरी जात असताना चार गुंडांनी त्यांना अडवलं आणि तिच्यासोबतच्या तरुणाला मारहाण केली. चाकूचा धाक दाखविल्याने तो पळून गेला. त्यानंतर या चौघांनी तिच्यावर अत्याचार केला. जिथे ही घटना घडली, तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागचा परिसर आहे. इतकी प्रसिद्ध आणि जुनी वास्तू असूनही इथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांचं शहर असलेल्या नागपूरमध्ये चाललंय तरी काय, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2015 08:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...