....आणि आठवलेंचं विमान हुकलं !

....आणि आठवलेंचं विमान हुकलं !

  • Share this:

athawale jet airways26 मे : विमानतळावर वेळेत पोचूनसुद्धा जेट एअरवेजच्या विमानात बसू दिलं नाही, असा आरोप आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. आठवले आज पहाटे जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईहून औरंगाबादला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोचले होते. पण जेट एअरवेजने उशिरा आल्याचं कारण देऊन त्यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे संतप्त झालेले आठवले रिकाम्या हाताने माघारी परतले.

रामदास आठवले औरंगाबादला जाण्यासाठी पहाटे मुंबई विमानतळावर पोहचले. मुंबई-औरंगाबाद विमानाची वेळ होती पहाटे 5 वाजून 15 मिनिटांची होतीय पण, जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांनी बोर्डिंग गेटमधून त्यांना विमानापर्यंत जाऊ दिलं नाही. बोर्डिंग पास असतानाही गेट बंद करण्यापूर्वी अनाऊन्समेंटही केली नाही असा आरोपही रामदास आठवले यांनी केला आहे. याप्रकरणी रामदास आठवले आता नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार करणार आहेत. याप्ररकणी आम्ही जेट एअरवेजशी संपर्क साधला तेव्हा जेट एअरवेजने कॅमेरासमोर बोलायला किंवा फोनवरुन प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. नेमकी घटना काय झाली, नेमकी काय परिस्थिती होती याचा आढावा घेतल्यानंतर आम्ही आमची बाजू मांडू असं जेट एअरवेजने सांगितलेलं आहे.

अखेर यावर जेट एअरवेजने खुलासा केलाय.

"मुंबई-औरंगाबाद विमानाची वेळ होती पहाटे 5 वाजून 15 मिनिटांची, पण खासदार रामदास आठवले हे चेक इन करण्यासाठी 4 वाजून 45 मिनिटांनी पोहोचले आणि इतक्या उशिरा विमान उड्डाणाचे सुरक्षेसंबंधी सर्व नियम पाळून त्यांना विमानात बसू देणं शक्य नव्हतं म्हणून जेट एअरवेजतर्फे त्यांना औरंगाबादला जाण्यासाठी दुसर्‍या विमानाची व्यवस्था करुन देण्याचं अथवा संध्याकाळच्या जेटच्याच विमानात सीट उपलब्ध करुन देण्याचे पर्याय देण्यात आले, पण रामदास आठवले यांनी हे दोन्ही पर्याय नाकारले."

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2015 09:23 AM IST

ताज्या बातम्या