मुंबई विमानतळावर दिसले 5 संशायस्पद पॅराशूट्स

मुंबई विमानतळावर दिसले 5 संशायस्पद पॅराशूट्स

  • Share this:

mumbai airport425 मे : मुंबई विमानतळावर शनिवारी संध्याकाळी आकाशात संशायस्पद पाच मानवरहित उडत्या वस्तूं पाहण्यात आल्यात. ही घटना उजेडात आल्यामुळे एकच खळबळ उडालीये. या पाच वस्तू पॅराशूट्स असल्यांचं स्पष्ट झालंय. पण, पंतप्रधान कार्यालयाने विमानतळ सुरक्षेत ही मोठी चुकी आहे. याबाबत भारतीय वायुसेना, नौसेना, गुप्तचर संस्था, सीईएसएफ आणि मुंबई पोलिसांकडून खुलासा मागवण्यात आलाय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी 5.55 वाजता जेट एअरवेजचे पायलट कॅप्टन दिनेश कुमार यांनी विमानतळावर पहिल्यांदा हे पॅराशूट्स पाहिले. त्यांनी तात्काळ एअरपोर्ट पोलिसांकडे माहिती कळवली. त्याचवेळी कोलकाताहून आलेलं इंडिगो एअऱलाईन्सचं विमान लँड करणार होतं. पण, खबरदारी म्हणून इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाची लँडिंग थांबवण्यात आली. विशेष म्हणजे, या पाच पराशूट्स बद्दल कोणतीही माहिती नव्हती. रडारवरही हे पॅराशूट्स दिसले नाही. मुंबई पोलिसांनी आता शहरातील सर्व मान्यताप्राप्त पॅराग्लायडिंग संस्थेचा तपास सुरू केलाय. या प्रकरणी एअर ट्रॅफिक कंट्रोल अधिकार्‍यांची चौकशी होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2015 12:42 PM IST

ताज्या बातम्या