S M L

ज्येष्ठ दलित नेते एकनाथ आवाड यांचं निधन

Sachin Salve | Updated On: May 25, 2015 11:08 AM IST

ज्येष्ठ दलित नेते एकनाथ आवाड यांचं निधन

25 मे : मराठवाड्यातील ज्येष्ठ दलित नेते एकनाथ आवाड यांचं आज (शनिवारी) निधन झालं. हैद्राबाद इथं पोटाच्या विकारावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे दलित चळवळीत पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात एकनाथ आवाड यांचा जन्म झाला होता. अत्यंत प्रतिकुल परिस्थिती आवाड यांनी बी ए आणि एम एस डब्ल्यूचा अभ्यासक्रमाचं शिक्षण लोकांच्या मदतीने पूर्ण केलं. विद्यार्थी दशेत असताना दलित पँथर संघटनेत सक्रिय सहभाग घेऊन दलित चळवळीच्या लढ्याला सुरुवात केली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनातही ते अग्रेसर होते. तसंच पोतराज प्रथेला आवाडांनी विरोध केला होता.

'लोकशाहीचा बाजार', 'उदयाचा माणूस', 'मानवी मूल्यांसाठी संघर्ष' या मुखपत्रांची सुरुवात केली. 1981मध्ये ठाणे जिल्ह्यातल्या विधायक संसद या संस्थेत आदिवासींची वेठबिगारीतून मुक्तता करण्यात सहभाग घेतला. मानवलोक यासंस्थेत रजनात्मक काम केलं.

1981 मध्ये कासा या संस्थेत क्षेत्र अधिकारी म्हणून 7 वर्षं काम केलं. विविध समाज घटकांसाठी सामाजिक शिक्षण, जाणीव जागृती, संघटना, गट बांधणी, महिला मंडळ आणि महिला विकासाचे कामं केली.

1990 मध्ये मानवी हक्क अभियानाची स्थापना केली. आवाड यांनी मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून विदर्भ-मराठवाडय़ातील दलित, आदिवासी आणि वंचित घटकांना सरकारी मालकीची 48 हजार हेक्टर गायरान जमिन मिळवून दिली.

Loading...

1993 मध्ये भूकंप पुनर्वसनात महत्त्वाची कामगिरी बजावली. 2000 मध्ये मराठवाड्यात बाल हक्क अभियानाची स्थापना केली. 2001 मध्ये जमीन हक्क अधिकार आंदोलन या संस्थेची स्थापना केली.

आवाड यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आवाड यांचं 'जग बदल घालूनी घावं' हे प्रसिद्ध आहे. आयुष्यभर समाजाचे चटके सहन करणार्‍या या लढवय्या नेत्याला गेल्या काही दिवसांपासून पोटाच्या विकाराने ग्रासले होते. त्यांच्यावर हैद्राबाद इथं उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2015 11:08 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close