मुंबई इंडियन्सचं 'किंग',चेन्नईचा पराभव करून जेतेपदाला गवसणी

Sachin Salve | Updated On: May 25, 2015 10:40 AM IST

मुंबई इंडियन्सचं 'किंग',चेन्नईचा पराभव करून जेतेपदाला गवसणी

25 मे : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून आपणच किंग असल्याचं दाखवून दिलं. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या आठव्या सीझनचं जेतेपद पटकावलंय. आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईनं चेन्नई सुपर किंग्जचा 41 रन्सनी पराभव केला. मुंबई इंडियन्सचं हे दुसरं आयपीएल जेतेपद ठरलंय .मुंबईने पहिली बॅटिंग करता चेन्नईपुढे 202 रन्सचा डोंगर उभा केला.पण उत्तरादाखल चेन्नई 161 रन्स एवढाच स्कोअर उभा करु शकली..

फायनलच्या सामन्यात टॉस जिंकून चेन्नईनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि चेन्नईनं पहिल्याच ओव्हरमध्ये मुंबईला दणकाही दिला. पार्थिव पटेल डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण त्यानंतर आलेल्या कॅप्टन रोहित शर्मानं लेंडल सिमन्सच्या साथीनं तुफान फटकेबाजी केली. सिमन्स आणि रोहित दोघांनीही शानदार हाफ सेंच्युरी ठोकल्या. सिमन्सनं 45 बॉल्समध्ये 68 तर रोहित शर्माने 26

बॉल्समध्ये 50 रन्स ठोकले. पण मुंबईच्या इनिंगचा स्पीड पोलार्ड आणि रायडूनं कायम राखला पोलार्डनं 18 बॉल्समध्ये 36 रन्स ठोकले. तर रायडूनं 24 बॉल्समध्ये 36 रन्स ठोकले. पण, आज हार्दिक पांड्या काही कमाल करु शकला नाही आणि मुंबईनं चेन्नईसमोर विजयासाठी 203 रन्सचं आव्हान उभारलं.

203 धावांचा पाठलाग करणार्‍या चेन्नईच्या बॅटिंगची सुरुवात खराब झाली. माईक हसी 4 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण ड्वेन स्मिथ आणि सुरेश रैनानं तुफान फटकेबाजी केली. पण ते टीमला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत. मुंबईच्या मिचेल मॅक्लिनागन ने सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. लसिध मलिंगा आणि हरभजल सिंगने प्रत्येकी दोन विकेटस् काढल्या आणि चेन्नईची टीम 8 विकेटंसच्या बदल्यात फक्त 161 रन्सवर बनवू शकली आणि मुंबईनं दुसर्‍यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं.

वानखेडेवर विजयोत्सव

मुंबई इंडियन्सची आयपीईएल जेतेपदाला दुसर्‍यांदा गवसणी घातली. आज रात्री वानखेडे स्टेडियमवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. आज रात्री आठ वाजता वानखेडे स्टेडियमवर विजयोत्सव रंगणार आहे. हा विजयोत्सव मुंबईकरांना अनुभवता येणार असून सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2015 10:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close