पालघरचे आमदार कृष्णा घोडा यांचे निधन

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 24, 2015 12:56 PM IST

पालघरचे आमदार कृष्णा घोडा यांचे निधन

Krushna Ghoda

24 मे : पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे आज (रविवारी) पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.  ते 61 वर्षांचे होते.

शनिवारी एक लग्नसोहळा आटपून कृष्णा घोडा घरी परतत होते. रात्री दोनच्या सुमारास घोडा यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूवच्च त्यांचा मृत्यू झाला.

घोडा आतापर्यंत चारवेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले होते. 1988 साली पहिल्यांदा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांआधी कृष्णा घोडा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर नुकत्याच पार पडलेल्या ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2015 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...